वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

निर्गुणाचा पालऊ लागल

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074314 · अभंग क्र. ६८८

688.
निर्गुणाचा पालऊ लागला ।
लय लक्षी हरपला देह माझा ॥१॥
वांयावीण गेले वांयावीण गेले ।
अवघी बुडाले ब्रह्मेसहित ॥२॥
रखुमादेविवरू विठ्ठलु मालाथिला ।
निजपद पावला जीऊ शीवा ॥३॥

अर्थ :
माझ्या चित्ताला निर्गुणाचा धागा लागल्यामुळे त्या निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला. त्यामुळे माझा देहभाव हरपला. एवढेच काय पण ब्रह्मदेवासहवर्तमान सर्व जग बुडाले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यानी माझा अंगीकार केल्यामुळे माझा जीव परमात्मस्वरूपाला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग