पुंड्यालागी कैसा आला
682.
पुंड्यालागी कैसा आलासी धावोनी ।
काय भक्ति पाहुनी भुललासी ॥१॥
काय केली ऐसी तये थोर भक्ती ।
मानली श्रीपती तुम्हालागी ॥२॥
ब्रह्मरू तया दाखविले डोळा ।
ऐसा काय भोळा होता पुंड्या ॥३॥
बहेणि म्हणे तुझ्या पाहोन ब्रह्मरूपा ।
विटेवरी देखा उभे केले ॥४॥
