वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कल्पतरूखाली बैसला भु

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076200 · अभंग क्र. ६८९

689.
कल्पतरूखाली बैसला भुकेला ।
तरी नाही धाला काय ऐसे ॥१॥
सापडला किंवा परीस जयाला ।
दारिद्र्याची त्याला पीडा उरे ॥२॥
घरी कामधेनू असताही बाधी ।
पोटाची उपाधी जयालागी ॥३॥
होय परी ऐसे माझिया मनाते ।
लाज आणिकाते काय देवा ॥४॥
बहिणी म्हणे येथे बोलावे ते कोणा ।
तुज नारायणा वाचोनिया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग