ठेवाल तेथे राहेन सुख
679.
ठेवाल तेथे राहेन सुखे ।
यावरी हरिखे आपुलिया ॥१॥
न वंची मी हे सेवेसी काया ।
धाडाल ठाया जाईन त्या ॥२॥
दयाल ग्रास तो घालिन मुखी ।
न करी आणखी सोस काही ॥३॥
निळा म्हणे कराल आज्ञा ।
न मोडी प्राज्ञा तुमची ते ॥४॥
679.
ठेवाल तेथे राहेन सुखे ।
यावरी हरिखे आपुलिया ॥१॥
न वंची मी हे सेवेसी काया ।
धाडाल ठाया जाईन त्या ॥२॥
दयाल ग्रास तो घालिन मुखी ।
न करी आणखी सोस काही ॥३॥
निळा म्हणे कराल आज्ञा ।
न मोडी प्राज्ञा तुमची ते ॥४॥