सकळ सुरा मुगुतमणी ।
692.
सकळ सुरा मुगुतमणी । जो का त्रैलोक्याचा धनी ।
भक्ता अभयदानी । उदारपणे ठाकला ॥१॥
आठवावा वेळोवेळां । भय नाही कळिकाळा ।
लागलासे चाळा । न फिरोचि माघारीं ॥२॥
मागा बहुता अनुभव । तारियेले पापी सर्व ।
एका जनार्दनी स्वयमेव । पंढरीराव पुरवीत ॥३॥
