पायांपाशी जीव ।
690.
पायांपाशी जीव ।
ठेवियला तुमच्या भाव ॥१॥
न्याल म्हणोनिया सदना ।
विठ्ठल देवा कृपाघना ॥२॥
आळवितो नामे ।
लाहो करुनिया प्रेमे ॥३॥
निळा म्हणे दिवसराती ।
दुजे नेणोनिया चित्ती ॥४॥
690.
पायांपाशी जीव ।
ठेवियला तुमच्या भाव ॥१॥
न्याल म्हणोनिया सदना ।
विठ्ठल देवा कृपाघना ॥२॥
आळवितो नामे ।
लाहो करुनिया प्रेमे ॥३॥
निळा म्हणे दिवसराती ।
दुजे नेणोनिया चित्ती ॥४॥