अनंत जन्मे मेळविता द
693.
अनंत जन्मे मेळविता दुर्लभ | तो प्राणवल्लभ शंकराचा ॥१॥
वेदशास्त्र मंथुनी काढियेले सार | ब्रह्मादिका पार रामनामे ॥२॥
स्वर्गीचे देव चिंतिताती मानसी | भेटी आम्हा कैसी पांडुरंगी ॥३॥
नामा म्हणे केशवाचे नाम उच्चारिता | विघ्नासी भंगिता नवल काय ॥४॥
