भेटी देता मज समाधान
681.
भेटी देता मज समाधान होये ।
तुझे काय जाये तयामाजी ॥१॥
देखवे न का तुज माझे समाधान ।
न देसी म्हणोन भेटी मज ॥२॥
भेटीचीही आस न ये पुरविता ।
ऐसा कैसा दाता विठ्ठला तू ॥३॥
रीती उदाराची ऐसीच का असे ।
कल्याण जगाचे देखवेना ॥४॥
बहिणी म्हणे तोंड कृपणाचे पुढे ।
वेंगाडिता कोडे पुरे काय ॥५॥
