म्हणोनिया विटले मन ।
692.
म्हणोनिया विटले मन ।
आले परतोन माघारिया ॥१॥
तुमचिया नामस्मरणी ।
रतले चरणी सुखावले ॥२॥
नाही येथे घातपात ।
पावती निभ्रांत निजठाया ॥३॥
निळा म्हणे ऐसिया आशा ।
राहिले भरवसा मानूनिया ॥४॥
692.
म्हणोनिया विटले मन ।
आले परतोन माघारिया ॥१॥
तुमचिया नामस्मरणी ।
रतले चरणी सुखावले ॥२॥
नाही येथे घातपात ।
पावती निभ्रांत निजठाया ॥३॥
निळा म्हणे ऐसिया आशा ।
राहिले भरवसा मानूनिया ॥४॥