वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

पूतना म्हणे भुकेला क

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089829 · अभंग क्र. ३९

39.
पूतना म्हणे भुकेला कान्हा।
मग झडकरी उघडूनी लाविला स्तना।
यशोदा म्हणे वो राजीवनयना।
न सोसे दूध आणिकीचे ॥१॥
स्तनी लागताचि त्याचे वदन।
विश ते अमृतसमान।
शोषूनिया रक्त मांस-जीवन।
पंचहि प्राण आकर्शिले ॥२॥
न सोसवे वेदना ते पूतने।
म्हणे ओढी ओढी यशोदे तान्हे।
ऐसे बाळ हे ही काय जाणे।
वेचले प्राण धाव धाव ॥३॥
तव तो न सुटेचि सर्वथा।
शिणल्या दासी परिचारिकाही ओडिता।
नाना शब्दे आक्रंदता।
बिहाली तत्वता पळती लोके ॥४॥
रक्त मांस अस्थींचे उदक।
करुनिया चर्महि शोषियले।
देऊनिया सायुज्यसुखनी स्थापियली ॥५॥
हे देखोनी दासी परिचारिका।
भेणेंचि पळती अधो मुखा।
जाऊनिया मथुरा लोंका।
सांगती वार्ता रायसी ॥६॥
निळा म्हणे ऐकता कानी।
राजा चिंतावला बहुत मनी।
पुसे वर्तमान तया लागुनी।
कैसे वर्तले ते सांगा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग