वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 13. संत चांगदेव › 1. संत चांगदेव महाराज अभंग गाथा › 1. संत चांगदेव महाराज संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 46 › 4. कुट

कुट

🙏 13. संत चांगदेव · ABH-073765 · अभंग क्र. ४३

43.
कुट

क्रोधाची आटी बांधोनियां पोटी । सासुरयापाठीं लागतसे ॥ १ ॥
पाहावो ईचें केवढें हालें । आल्यामधे करीतसे बोल ॥ २ ॥
सांडोनि निःशंक झाली । पांचाही बांधिली पाठीवरी ॥ ३ ॥
चांगा म्हणे जीवांचे गुज । वटेश्वरें मज सांगितले ॥ ४ ॥

44.
मुंगळावरी मुंग्यांच्या हारी । दुजनी नारी दावितसे ॥ १ ॥
मुंगी लाठी मुंगी लाठी । वैकुंठांच्या खुणा सांगतसे गोष्टी ॥ २ ॥
मुंगीच्या गळा तुळशीचा लोहदाणा । चांगावटेश्वर सांगतो खुणा ॥ ३ ॥

45.
सासूचे आधी सून जन्मली । सून मारून सासू नोवरी झाली ॥ १ ॥
आचोजीं चोजविले । तें स्वर्गी जाणवलें भाई ॥ २ ॥
पुत्र पितियाचा व्रतबंध करी । वांझ सासू कन्यादान जे नोवरी ॥ ३ ॥
सिद्धांताचे वर्म अनुभवी जाणे । वटेश्वर चांगा बोलिला खुणां ॥ ४ ॥

46.
नोवरीचे हाता चित्रिव काठी । नोवरी लागे संन्याशापाठीं ॥ १ ॥
नारायण म्हणे नारायण म्हणे । नारायण म्हणे वो नोवरीये ॥ २ ॥
विश्वस्वरूप नोवरी संन्याशा रातली । त्या आम्हा भली सोयरीक जाली ॥ ३ ॥
दिगंबर नोवरा क्षणिक वऱ्हाडी । वटेश्वरचांगा वाहतो लुगडी ॥ ४ ॥

अभंग गाथा समाप्त...

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग