वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आम्ही तो निर्हेत साक

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076001 · अभंग क्र. ४२

42.
आम्ही तो निर्हेत साक्ष ऐसी येत ।
भोगामाजी चित्त क्षणु नाही ॥१॥
आता मना येथे काय तुझे चाले ।
निर्हेत पाउले विठ्ठलाची ॥२॥
मनात पाहिले बुद्धीत गाइले ।
चित्तात ध्याइले विठ्ठलासी ॥३॥
वासना गाळिली सर्वही चाळिली ।
शांति स्थिरावली विठ्ठली हे ॥४॥
काम क्रोध लोभ मत्सराचे अंग ।
जाला पांडुरंग आपणाची ॥५॥
बहेणि म्हणे मना हेतूचा उगाणा ।
करूनी निर्वाणा पाहतसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग