भक्तांचिया लोभा वैकु
41.
भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिले । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥
कनवाळु उदार तो हा श्रीहरि । जडजीवा उध्दरी नामे एका ॥२॥
बांधियेले ब्रीद तोडर चरणी । त्रैलोक्याचा धनी पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल । नलगे काळ वेळ नाम घेता ॥४॥
