वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

स्नेह सरता जैसा दीन।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089903 · अभंग क्र. ४१

41.
स्नेह सरता जैसा दीन।
सूक्ष्म होतचि हारप।
तयापरी बाईंचे स्वरुप।
तेणे शोषूनि घेतले ॥१॥
नाही उरविले शरीर।
अवघेचि केले निराकार।
ऐसे देखोनिया सत्वर।
आम्हीही निघालो तेथुनी ॥२॥
राया त्याची भेटी गोष्टी।
न व्हावी तुम्हाही शेवटी।
अकस्मात् झालिया राहाटी।
करील पूतनाबाई सारिखी ॥३॥
ऐसे ऐकताचि श्रवणी।
राजा पडे मूच्छित धरणी।
म्हणे गेली गेली रे मायबहिणी।
माझी पूतनेसारखी ॥४॥
महाबळे अति उत्कंठ
मंत्रियांमाजी परमश्रेष्ठ।
आता कायसी पाहो वाट।
गेली नये त्या निजपंथे ॥५॥
मग रायाते संबोधून।
प्रधान आणि नागरीक जन।
म्हणती नव्हे भले हे महा विघ्न।
उदेले देखत देखत ॥६॥
निळा म्हणे याहीवारी।
श्रीहरिचरित्राची थोरी।
अधिके अधिक् ते कुसरी।
परिसावी सज्जनी सादर ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग