निर्दोष रहित सर्व गु
40.
निर्दोष रहित सर्व गुणी हेत । द्वैत विवर्जित अरुप सदा ॥१॥
ते रुप स्वरुप कृष्ण बाळलीला । माजि त्या गोपाळा सदा वसे ॥२॥
गुणागुणी धीट वासना अविट । तद्रूप प्रगट निरंजन ॥३॥
विकार विवर्जित विवरण सोपे । आकार पै लोपे एक नामे ॥४॥
निःसंदेह छंद वासनेचा कंद । ब्रह्माकार भेद नाही सदा ॥५॥
निवृत्ति परिवार ब्रह्मरुप गोकुळी । वृंदावन पाळी यमुना तटी ॥६॥
अर्थ:
गुणातित, निर्दोष द्वैत नसलेले अरुप निर्गुण असलेले हे परमात्म स्वरुप आहे. असे ते निर्गुण रुप गोकुळात सगुण कृष्ण रुप घेऊन गोकुळात गोपाळासह लिला करत आहे. ते परब्रम्ह तद्रुप, निरंजन स्वरुपात असुन सगुण साकार होते तेंव्हा त्याला गुण वासना शिवत ही नाहीत. तेच परब्रह्म निर्विकार असुन त्याचा आकार नामात लोप पावतो. व त्या नामामुळे त्याचे विवरण करणे सोपे होते. वासनेचा त्याग करुन त्या परमात्म्याचा छंद धरला तर ते ब्रह्म साधकास प्राप्त होते व त्या साधकापाशी भेद राहात नाही.निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा त्या वृंदावनात यमुनेतटी राहात होता त्यांच्या सोबत मी परिवारासह होतो.
