वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

मन मुरडोनी डोळा लेईल

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074974 · अभंग क्र. ३९

39.
मन मुरडोनी डोळा लेईले ।
काळेपणे मिरवले रूप त्यांचे ॥
बरवे रूप काळे अमोलिक ।
म्हणोनिया सांगतसे शुद्ध भावे ॥
रखुमादेविवरू अगाध काळे ।
म्हणोनि सर्वत्र व्योम अर्पियेले ॥

अर्थ :
त्याचे काळेपण मिरवत असलेले रुप मी पाहिले तेंव्हा मन मारुन मी डोळ्यात साठवले. तेच काळेपण अनमोल असुन तेच मी शुध्द भावाने वर्णित आहे. ज्याने सर्व आकाश व्यापले तो रखुमाईचा पती अगाध (ठाईचा ) काळा आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग