वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

म्हणसील मना इंद्र म्

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076300 · अभंग क्र. ४०

40.
म्हणसील मना इंद्र म्या ठकिला ।
ब्रह्मयाचा केला मानभंग ॥१॥
तुझा तेथे काय पाड असे मूढा ।
मनाचा पवाडा वेदशास्त्री ॥२॥
नारदाची केली नारदी आपण ।
माझे ठायी पण बोलो नये ॥३॥
शिवासी आपण हिंडविले रान ।
विष्णु करी ध्यान वृंदा वृंदा ॥४॥
व्यासासी ठकविले ऋषी नागविले ।
मज मनावेगळे काय असे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा मनाचा प्रतिशब्द ।
ऐकोनिया स्तब्ध चित्त जाले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग