वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ६, भुपाळ्या अभंग

माझे चित्त तुझे पायी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073127 · अभंग क्र. ३९

39.
माझे चित्त तुझे पायी । राहे ऐसे करी काही ।
धरोनिया बाही । भव हा तारी दातारा ॥१॥
चतुरा तु शिरोमणी । गुणलावण्याची खाणी ।
मुकुट सकळा मनी । धन्य तूंची विठोबा ॥२॥
करी या तिमिराचा नाश । उदय होऊनी प्रकाश ।
तोडी आशा पाश । करी वास हृदयी ॥३॥
पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता ।
तुका ठेवी माथा । पायी आंता राखावे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग