वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

तव त्या करिती शंखस्फ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089826 · अभंग क्र. ४०

40.
तव त्या करिती शंखस्फूरण।
दीर्धवरे आक्रदन।
ते ऐकांनिया नागरीक जन।
हाहाभूत वोरसले ॥१॥
तयाते पुसता त्य म्हणती।
दु:खर्णवी पडिलो हो भूपती।
सांगता पुतनेची गती।
मूच्छित पडती धरणीये ॥२॥
म्हणती जाताचिं गोकुळाभीतरी।
प्रवेशता नंद यशोदे घरी।
उभयता येऊनिया सामोरी।
बहुत सन्माने गौरविले ॥३॥
विडे उपचार भोजन।
पूतनाईते तोषवून।
मग आणिले राजीवनयन।
बाळ तान्हुले दाखविती ॥४॥
तव ते घन:श्याम सांवळे।
राजीवाक्ष राप रेखिले।
बाळलेणे विराजले।
नयनचि गोविले देखता ॥५॥
मग ते घेऊनिया जवळी।
सतनी लाविताचि तात्काळी।
सुरासुरा शोषुनिया वेल्हाळी।
न सोडी जिवे प्राण जाता ॥६॥
निळा म्हणे त्या सोडविता।
न सुटे पूतना आक्रंदता।
आम्हीही स्वशक्ती ओढिता।
हरिले तत्वता प्राण तिचे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग