वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

जागा जागारे आपले मनी

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081001 · अभंग क्र. ४२

42.
जागा जागारे आपले मनी । भाव ठेउनी गुरुचरणी ॥
मन राखेल जनी वनी गा रामा । कृष्णा बा हरि ॥
भले भले रे पूर्वदत्ता । केले फळ ते आले हाता । मग भेटी जाली भगवंता ॥
वासनेचा वास हा मोडी । आशा मनसा घाली दवडि । कुबुध्दीची कुलपे मोडी ।
काही करावे आपुले हित । दया धर्मी द्या बा चित्त । नामी न करा दुश्चित ।
गा बोधला म्हणे बोधली मी पणासी आचवला । हरिचरणी जाउनी विनटलो ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग