नवल देखिले कृष्णरूप
43.
नवल देखिले कृष्णरूप बिंब ।
सांवळी स्वयंभ मूर्ति हरीची ॥
मन निवाले समाधान जाले ।
कृष्णरूपे बोधले मन माझे ॥
बापरखुमादेविवरू सांवळा सर्व घटी ।
चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो ॥
अर्थ :
त्या सावळ्या कृष्णाची स्वयंभु मूर्ती मी पाहिली व मला त्याचे नवल वाटले. त्या कृष्णरुपाच्या बोधामुळे माझे समाधान झाले व मन शांत झाले. तो रखुमाईचा पती व माझे पिता सर्वांमध्ये चैतन्यरुपाने असुन त्याला मी मिठीत कवळुन घेत आहे. असे माऊली सांगतात.
