भाविकांच्या लोभा होऊ
42.
भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥
काय करो प्रेम न कळे या देवा । गुंतोनिया भावा राहे सुखे ॥२॥
वर्ण अभिमान न धरी कांही चाड । भक्तिसुख गोड तयालागी ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळ् माउली । कृपेची साउली दीना करी ॥४॥
