पंच महा पातकी विश्वा
41.
पंच महा पातकी विश्वासघातकी । राम नामे सुखी विश्वजन ॥१॥
महा पापराशी वाल्हा तो तारिला । उद्धार तो केला गणिकेचा ॥२॥
पुत्राचिया नामे वैकु ठाची गती । अजामेळा मुक्त हरीनामे ॥३॥
नामेंची तरले नर आणि नारी । म्हणजसे महारी चोखियाची ॥४॥
