बहुतांचे धांवणे केले
40.
बहुतांचे धांवणे केले बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागे तीरी । उभा विटेवरी विठ्ठल देवो ॥२॥
भक्तीचा आळुका भावाचा भुकेला । न कळे ज्याची लीला ब्रह्मादिका ॥३॥
चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी । दरूशने उध्दरी जडजीवा ॥४॥
