वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

येरी म्हणे काय करू व

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072996 · अभंग क्र. ४१

41.
येरी म्हणे काय करू वो सुंदरी । आता आहे धरी काय माझे ॥१॥
प्राणनाथे पेणे केले स्वर्गलोका । जाईन मी देखा तयासये ॥२॥
वडिलपणे तुह्मी लोभ असो द्यावा । सांभाळ करावा बाळकांचा ॥३॥
वागुरे माझारी गुंतलासे कांत । कायसे जीवित विचारी पा ॥४॥
न लावी उशीर जाई येच क्षणी । अससी गर्भिणी पूर्ण दिवस ॥५॥
जरी देसी प्राण पतन गर्भासी । होय ते दोषासी पात्र होसी ॥६॥
पोसोनिया बाळे वाढवी वंशाला । द्यावे चित्त बोला माझ्या आता ॥७॥
पळावया तुज नाही अंगी बळ । न देखता खळ जाई वेगी ॥८॥
नामा ह्मणे ऐसी उत्तरे ऐकिली । तेही घाबरली तयेवळे ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग