वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

सांवळिया तेज सांवळा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074980 · अभंग क्र. ४२

42.
सांवळिया तेज सांवळा श्रीहरि ।
शेजबाजवोवरी ब्रह्मांडाची ॥
गृहदारा दिनमणी तेज देऊनि मेदिनी ।
मेरू प्रदक्षणि आप होये ॥
ऐसा हा सांवळा सतेज साजणी ।
म्या आपुल्या अंगणी देखीयेला ॥
ज्ञानदेवा साजण सांवळिये प्रभेचे ।
मी माझे मोहाचे हरिरूप ॥

अर्थ :
सावळा श्रीहरि सावळ्या तेजाने तळपत असुन त्यांने ब्रह्मांडाच्या बाज करुन त्यावर शेज केले आहे. घरदार सर्व पृथ्वीच तेजस्वी करुन तो मेरु प्रदक्षिणा करत आहे. हे सखी असा तेजःपुंज सावळा त्याला मी माझ्या अंगणात पाहिला. हे सखी त्या सावळ्या प्रभेला पाहताच मी त्याला मोहाने पाहायला गेले तर मोहच हरिरुप झाला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग