जातक कर्मसंस्कार
42.
जातक कर्मसंस्कार
करुनिया स्नान । वस्रे घेतली नूतन ॥१॥
पाचारा ब्राह्मण । श्रृगारावे देवसदन ॥२॥
बाहा बाहा दशग्रंथी । त्यासी सांगा आणा पोथी ॥३॥
त्वरे बाहारे ज्योतिषी । नंद करी जातकासी ॥४॥
केले देवतार्चन । द्विज सांगती तर्पण ॥५॥
फार त्याला मुख । पाहे कृष्णाजीचे मुख ॥६॥
करी पुण्याहवाचने । नामा ह्मणे आनंदाने ॥७॥
