वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

इंद्राचा संकेत होता

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076236 · अभंग क्र. ४१

41.
इंद्राचा संकेत होता लग्नकाळी ।
भोगीन मी वळे आहिल्येसी ॥१॥
हेत होता त्याचा त्वा काय केले ।
हेतेचि बांधिले ज्याचे तया ॥२॥
ब्रह्मयाचा हेत भवानी सुंदर ।
अंगुष्ठे विकार आणियेला ॥३॥
नारदेही तेची मागितले दान ।
हेतेचि बंधन पावला तो ॥४॥
शिवासी कामाचा हेत सर्वकाळ ।
म्हणोनी चपळ बाधी तया ॥५॥
व्यासही तैसाची निष्काम तो नाही ।
तो पडे अपायी नवल कोण ॥६॥
बहेणि म्हणे हेत गुंतला ते ठाई ।
घालिसी अपायी सत्य मना ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग