खेळतसे खेळ सवंगडियां
42.
खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥ जयाचिये चित्ती जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणे ॥२॥ जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥ एका जनार्दनी भाविकांच्या पाठी । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥
