वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

पियुषी पुरते कासवी त

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090089 · अभंग क्र. ३९

39.
पियुषी पुरते कासवी ते विते । संपूर्ण दुभते कामधेनु ॥१॥
तेंचि हे डोळस सांवळे सुंदर । यशोदे सकुमार बाळकृष्ण ॥२॥
मधुर क्षारता माधवी अखंड । दिनकाळ प्रचंड आत्माराम ॥३॥
निवृत्तिचे ताट पियूष पुरते । कांसवी दुभते वाढियेसि ॥४॥

अर्थ:
कासवीचे दुध फक्त तिच्या पिला पुरते असते तर कामधेनुचे दुध तिच्या वासरासकट सर्वांसाठी वापरता येते. गाय जशी सर्वांना दुध देऊन तृप्त करते तसे परब्रह्म सर्वांच्या इच्छा पुर्ण करतो. तोच परमात्मा आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सुकुमार सावळा बाळकृष्ण यशोदेचा पुत्र बनुन गोकुळात आला आहे. जसे वृक्ष एका विशिष्ट काळात मधुर, आंबट तुरट फळे देतात तसे काळाचे बंधन ह्या परमात्म्याला नाही तो भक्ताला कालातीत होऊन तृप्त करतो.निवृत्तिनाथ म्हणतात कासवी जशी आपल्या पिलास दुध देऊन वाढवते तसे भंगवता तुम्ही मला हे ज्ञानामृत देत आहात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग