वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

जयदेव जयदेव जय विश्व

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080992 · अभंग क्र. ४०

40.
जयदेव जयदेव जय विश्वंभरा । दर्शन व्यापक तुजविण नाही दुसरा ।
तारक मारक हरि तू भक्तांचा सोयरा । आरती ओवाळू तुज परात्परा ॥
विश्व व्यापक तो हा विश्वाचे ठायी । प्रकृतीवेगळा अससी विदेही ।
देहीचा चालक तू खेळविता पाही । तुजवाचुनी आणिक कोणीही नाही ॥
नावरुप तुज याती नाकुळ । ब्रह्मांडनायक तू व्यापक सकळ ।
कीडा कीटक मुंगी सर्वाचे मूळ । अभक्तासी काय भक्त गोपाळ ॥
साधु संत जन तुज ध्याती सकळ । जया जैसा भाव त्या तैसा गोपाळ ।
जाणिव कृपाळू संचिताचे मूळ । संचितावेगळे कैचे ते फळ ॥
माता पिता बंधु तूची सकळ । कन्यापुत्र अखंड तूची केवळ ।
भक्त भाविक जन तुज ध्यानी सकळ । इतरासी न कळे बा भ्रांतीचे मुळ ॥
बोधला म्हणे शरण मी आता । अखंड निजाध्यास हरिगुण गाता ।
हृदयी प्रकाश तुझा समयी । तुज वाचोनी आण नेणे सर्वथा ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग