वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 26. नंदगृही पुत्रोत्साह

कंसविचार

🙏 4. संत नामदेव · ABH-083479 · अभंग क्र. ३९

39.
कंसविचार

बोलावूनी अवघींयाते । कंस पाहे विचाराते ॥१॥
कोणीएक रे बोलती । आह्मा ठावी देववस्ती ॥२॥
जेथे पुराण कीर्तन गाईब्राह्मण करिती यज्ञ ॥३॥
तेथे असे नारायण । वधू तयासी जाऊन ॥४॥
वैरी सहजची मरेल । ऐसे बोलताती बोल ॥५॥
कंसा मानवले जाण । करा मजसाठी यत्न ॥६॥
नामयाच्या छंदे । नंद करितो आनंद ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग