जन्मोजन्मी आमचा केला
39.
जन्मोजन्मी आमचा केला प्रतिपाळ । करितसे सांभाळ रात्री दिवस ॥
तरि तू आमचा मातापिता । सोयरा सर्वथा निवारिली वेथा जन्मांतरिची ॥
फेडियेले रिण तोडियेले हिण । कैसी मोहियेले मन पांडुरंगा ॥
अनंत कोटी आमच्या पातकाच्या रासि । त्या तु हृषीकेशी दुर केल्या ॥
नाही विचारिले दोष आमचे काही । बांधलेस पायी बोधला म्हणे ॥
