ब्रह्मचर्य आणि संन्य
43.
ब्रह्मचर्य आणि संन्यास घेईजे ।
वानप्रस्थ कीजे याचिलागी ॥१॥
निर्वासना साधे हेत हा निरसून ।
विषयाचा मन वीट धरी ॥२॥
योगायोग तपे व्रते अनुष्ठान ।
सेवावे अरण्य याचिलागी ॥३॥
बहेणि म्हणे हेत विषयांचा निरसला ।
तरी मना तुला कोण पुसे ॥४॥
