मी माझे करिता गेले ह
41.
मी माझे करिता गेले हे दिवस । न धरीच विश्वास रामनामी ॥१॥
अंती तुज उद्धरती रामकृष्णहरी । राम पंचाक्षरी मंत्रसार ॥२॥
का करीशी सांठा प्रपंचविस्तार । न तुटे येरझार नामेंवीण ॥३॥
नामा म्हणे ऐसे रामनमामी पिसे । तो उद्धरेल आपैसे इहलोकी ॥४॥
