वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

काय धर्म नीत । तुम्ह

🙏 3. संत तुकाराम · ABH-078205 · अभंग क्र. २४०८

2408.
काय धर्म नीत । तुम्हा शिकवावे हित ॥१॥
अवघे रचियेले हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥धृपद॥
नाम महादेव । येथे निवडला भाव ॥२॥
तुका म्हणे वेळे । माझे तुम्हा का न कळे ॥३॥

अर्थ :
हे शंकरा आम्ही तुम्हाला धर्म नीती काय म्हणून शिकवावे? तुम्ही एका क्षणांमध्ये सर्व ब्रह्मांडाची लीला करून रचना केली आहे. देवा तुमचे नावच महादेव आहे म्हणजे येथे तुमच्या नावातच सर्व भेद निवडला गेला आहे महादेव म्हणजे सर्व देवांमध्ये तुम्ही महान आहात. तुकाराम महाराज म्हणतात अहो महादेवा तुम्ही सर्व जगाचे कल्याण करता परंतु माझ्या वेळेसच तुम्हाला माझे कल्याण करावे हीत करावे असे का कळत नाही?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग