देव जाला पाठींपोटी ।
2425.
देव जाला पाठींपोटी । तया नाही आटापाटी ॥१॥
जेथे जाय तेथे देव । नाही भेव सर्वथा ॥२॥
संसारासी मारुनी लाथा । केला तत्त्वता देशोधडी ॥३॥
विषयांचें ठेचिलें तोंड । मोडिलें बंड पांचाचें ॥४॥
जनार्दनाचा एक म्हणे । देवा पाहणें पाठींपोटी ॥५॥
