पातला रे भवगजपंचानन
2415.
पातला रे भवगजपंचानन । निरसूनियां जन झाला जनार्दन ॥१॥
नाभी नाभी नाभीसी काह्मा । नाथिला संसार लटकी ही माया ॥२॥
वचनाचेनि घाये संशय तोडिले । अनेकत्व मोडुनि एकत्व जोडिले ॥३॥
वांझेचा पुत्र कळिकाळाचा वैरी । एक जनार्दनी संसार तोडरीं ॥४॥
