वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

सरते माझे तुझे । तरि

🙏 3. संत तुकाराम · ABH-078010 · अभंग क्र. २४५५

2455.
सरते माझे तुझे । तरि हे उतरते ओझे ॥१॥
न लगे सांडावे मांडावे । आहे शुद्ध चि स्वभावे ॥धृपद॥
घातला तो आशा । मोहोजाळे गळा फासा ॥२॥
सुखदुःखाचा तो मान । नाही दुःखाचा तो शीण ॥३॥
करिता नारायण । एवढे वेचिता वचन ॥४॥
लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥
तुका म्हणे याचे । नांव सोंवळे साचे ॥६॥

अर्थ :
एकदा की माझे व तुझे हे अंतकरणातून निघले की मग मनुष्याच्या देहावरून अभिमानाचे ओझेच उतरले असे समजावे. मग त्याला काहीही घ्यावे दयावे लागत नाही आणि विचार करून पाहिले तर मनुष्यस्वभाव सुद्धा शुध्द आहे. आशा व मोहजाळाने मनुष्याच्या गळ्याला फासा घातला आहे. असे जरी असले तरी मनुष्याने सुख झाले तरी त्याचा अभिमान वाटू देऊ नये आणि दुःख झाले तरी त्याचा शीण वाटू देऊ नये. मनुष्याने असे म्हणावे की सर्वकर्ता नारायणच आहे केवळ एवढेच शब्द जरी उच्चारले तरी कोणत्याही प्रकारचे सुखदुःख मनुष्याला होणार नाही. तसेच मान अपमान आणि लाभ-हानी हे सारखेच आहेत असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात याच अवस्थेला सोवळे असे खरे नांव आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग