वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

हुंबरती गाये तयांकडे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077895 · अभंग क्र. २४२०

2420.
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥
गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणे वनमाळी सुखावला ॥धृपद॥
चोरोनिया खाये दुध दही लोणी । भावे चक्रपाणि गोविला तो ॥२॥
निष्काम तो झाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥३॥
जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥४॥
तुका म्हणे हे चि चैतन्ये सावळे । व्यापुनि निराळे राहिलेसे ॥५॥

अर्थ :
ज्या वेळी भगवान गायी चारण्या करता वनात घेऊन जात त्यावेळी हा मोक्षाचे निदान कैवल्याचे निदान भगवान श्रीकृष्ण गायीच्या हुंबरण्याकडे कान देऊन उभा राहत असत. आणि गोपाळ गायी चारण्यास गेले की तेथे भगवंताची पूजा करायचे ती म्हणजे अशी की आपल्या मुखातील उष्टा घास भगवंताच्या मुखात घालत आणि त्यामुळे वनमाळी भगवंत खूप सुखावला जायचा. हा हरी दही-दूध-लोणी चोरून खायचा त्यामुळे गोपिका त्याला बांधून ठेवायच्या परंतु त्याला बांधणे शक्य नाही असे असले तरी केवळ त्यांच्या प्रेमभावामुळे हा चक्रपाणी त्यांच्या प्रेम बंधनात बांधला जायचा. हरी निष्काम असून देखील काम लंपट झाला आणि गोपिकांची वाट पाहत बसला होता. सगळ्या जगाला दान देणारा भगवंत केवळ एका तुळशीच्या पानाची इच्छा करतो म्हणजेच तो भक्तांच्या भक्तीला विकला गेला होता. तुकाराम महाराज म्हणतात हेच ते सावळे चैतन्य आहे की जे सर्वत्र व्यापून देखील सर्वांपेक्षा वेगळे होऊन राहिले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग