समुळ मुळी पाहता पाहण
2440.
समुळ मुळी पाहता पाहण्या उपरम 2440
समुळ मुळी पाहता पाहण्या उपरम । भोग भोक्ता तेथे सहज परब्रह्मा ॥१॥
भोगुं मी काय त्यागुं मी काय । त्याग भोग दोन्ही चैतन्य माय ॥२॥
भोग भोगितां भोग त्यागितां त्याग । दोन्हींचें निखळ अधिष्ठान अंग ॥३॥
एका जनार्दनी एकपण त्यागी । ब्रह्मारुप जग आदळे अंगी ॥४॥
