प्रतिमाचि देवो ऐसा ज
2408.
प्रतिमाचि देवो ऐसा ज्याचा भावो । तो न करी निर्वाहो आम्हांलागीं ॥१॥
असता सबराभरित बाहेर जो अंतरी । तो संपुष्टामाझारी म्हणती देवो ॥२॥
द्वारका पंढरी देवयात्रा करी । सर्वत्र न धरी तोचि भावो ॥३॥
सुक्षेत्रीं पुण्य मा अन्यत्र ते पाप । नवल हा संकल्प कल्पनेचा मतवाद्या ॥४॥
द्वारका पंढरी देवयात्रा करी । येर काय भारी वोस पडे ॥५॥
एक जनार्दनी स्वतः सिद्ध असे । विस्मरण स्मरण होत असे नाथिलें ते पिसे ॥६॥
