वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

जीवीचे का नेणा । परि

🙏 3. संत तुकाराम · ABH-078011 · अभंग क्र. २४४०

2440.
जीवीचे का नेणा । परि हे आवडी नारायणा ॥१॥
वाढवावे हे उत्तर । काही लाड करकर ॥धृपद॥
कोठे वाया गेले । शब्द उत्तम चांगले ॥२॥
तुका म्हणे बाळा । असता तात्पर्य खेळा ॥३॥

अर्थ :
हे नारायणा माझ्या मनात कोणती इच्छा आहे हे तुम्हाला माहित नाही काय परंतु तुम्हाला माझ्या मुखातून ती इच्छा ऐकायची आहे आणि तुम्हाला हेच आवडते. अहो तुम्ही मला सारखे बोलून माझे बोलणे वाढवता आणि लाडाने माझ्याकडून काहीतरी करकर करून घेता. देवा मी बोललेले सर्व शब्द चांगले व उत्तम असून ते कधी वायाला गेले आहेत काय? तुकाराम महाराज म्हणतात या गोष्टीचा अर्थ असा की माझ्यासारख्या बाळाला सारखे सारखे तुम्ही बोलायला लावता आणि तुम्ही स्वतःची करमणूक करून घेता.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग