येणे जानें खुंटले क्
2435.
येणे जानें खुंटले क्रियाकर्म ठेले । मज माझे भेटलें आत्मरुप ॥१॥
त्यागुं ते काय भोगुं ते काय । सर्व ब्रह्मारुप पाहे कोंदाटले ॥२॥
क्रियाकर्मधर्म निखिळ परब्रह्मा । त्यागुं भोगुं तेथे केवळ भ्रम ॥३॥
एका जनार्दनी सहजीं सहज एक । एकीएक पहाता कैंचे अनेक ॥४॥
२४३६ .
जाणपणें वस्तु जाणो मी जाये ।
जाणपणे वस्तु जाणो मी जाये । माझी जाणीव कैसी मज आड ठाये ॥१॥
जाणो मी कैसे जाणो मी कैसे । जाणपणे पिसे लावियेले ॥२॥
जाणपणाचें पडळ जे आले । जवळीचे वस्तुचें देखणे ठेले ॥३॥
एका जनार्दनी सुदलें अंजन । पडळ भेदोनिया दाविले निधान ॥४॥
