अहो उभा विटेवरी । भर
2438.
अहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥
निवारले जाणे येणे । कोणा कोणे रुसावे ॥धृपद॥
संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥२॥
तुका म्हणे उभयता । भेटी सत्ता लोभाची ॥३॥
अर्थ :
आहो विटेवर उभे असणाऱ्या देवा तुम्ही आमच्या आजपर्यंत खूप खटपट चुकविली आहे. तुम्ही आमच्या सर्वांचे जन्म-मरणच चुकविले आहे त्यामुळे आता आम्ही कोणी व कोणावर रुसावे. आतापर्यंत विविध प्रकारचे संकल्प करण्यातच माझे बळ खर्च झाले आहे आणि त्या संकल्पाच्या भाराने विविध प्रकारचे सुख आणि दुःख रुपी फळे निर्माण झालेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची माझी भेट केवळ लोभाच्या सत्तेमुळे झाली. नाही तर माझ्यात एवढे बळ नव्हते कि तुमची माझी भेट व्हावी.
