जाणती हे कळा हारपोनि
2428.
जाणती हे कळा हारपोनि गेली
जाणती हे कळा हारपोनि गेली । वृत्ति मावळली तयामाजीं ॥१॥
पाहता पहाणें हारपोनि गेले । मी माझे सरलें तयामाजीं ॥२॥
अंतर बाहेरीं पाहता शेजारी । शून्याची वोवरी ग्रासियेली ॥३॥
ग्रासियेले तेणे चंद्र सुर्य दोन्ही । एका जनार्दनी आनंद झाला ॥४॥
