वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

धन वित्ते कुळे । अवघ

🙏 3. संत तुकाराम · ABH-078024 · अभंग क्र. २४३२

2432.
धन वित्ते कुळे । अवघियाने ते आगळे ॥१॥
ज्याचे नारायण गाठी । भरला हृदय संपुटी ॥धृपद॥
अवघे चि गोड । त्याचे पुरले सर्व कोड ॥२॥
तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त ॥३॥

अर्थ :
धन, वित्त आणि कुळ यापेक्षा वैष्णव हे सगळ्यापेक्षा महान आहेत. अशा महान थोर वैष्णवांच्या पदरात नारायण आहे व त्यांच्या हृदय पेटी मध्ये ही तोच आहे. वैष्णवांचे सर्व वागणे चालणे बोलणे हे गोड असून नारायण त्यांच्या हृदयात असल्यामुळे त्यांचे सर्व लाड पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात सूर्‍याला तरी उदय अस्त आहे परंतु वैष्णवांच्या तेज्याला कधीही अस्त नाही केवळ उदयच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग