दर्पणामाजीं आपण । जी
2455.
दर्पणामाजीं आपण । जीवरुपें शिव जाण ॥१॥
जेणे स्वरूपें आपण । तद्रूप बिंब दिसे जाण ॥२॥
अग्नि राखें झाकोळिला । तरी अग्नीपणें संचला ॥३॥
जीवशिव दोन्ही हो का एक । तरी मलीन एक चोख ॥४॥
थिल्लरीं प्रतिबिंब भासे । बिंबाअंगीम काय संचिता वसे ॥५॥
निर्वाळूनि पहाता वेगी । बिंब प्रतिबिंब वाउगी ॥६॥
ऐसे भुलूं नये मन । शरण एका जनार्दन ॥७॥
