वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

बोलावे ते आम्ही आता

🙏 3. संत तुकाराम · ABH-078273 · अभंग क्र. २४३३

2433.
बोलावे ते आम्ही आता अबोलणे । एकाचि वचने सकळांसी ॥१॥
मेघवृष्टी काही न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळे ॥धृपद॥
तुका म्हणे नाही समाधाने चाड । आपणा ही नाड पुढिलांसी ॥२॥

अर्थ :
जे न बोलण्या सारखे आहे ते आम्ही आता उघडपणे बोलून सर्वांना एकच उपदेश करत आहोत. मेघ जसे वृष्टी करताना ठाव ठिकाणा पहात नाही सर्वांसाठी एक समान वृष्टी करते त्या प्रमाणे मी उपदेश करताना सर्वांना समान करत आहे आणि ज्याचा जसा भाव असेल तसा त्याला तो उपदेश फळ देईल. तुकाराम महाराज म्हणतात मी समाजाला उपदेश करताना कोणाला समाधान वाटावे किंवा मला समाधान वाटावे हा माझा हेतू नाही आणि मी तसे जर केले तर समोरच्यालाही त्रास आणि मलाही त्याचा त्रास होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग