वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

मागे बहुता जना राखिल

🙏 3. संत तुकाराम · ABH-078237 · अभंग क्र. २४४८

2448.
मागे बहुता जना राखिले आडणी । धावसी निर्वाणी नाम घेता ॥१॥
ऐसे ठावे झाले मज बरव्या परी । म्हणऊनि करी धावा तुझा ॥धृपद॥
माझेविशी तुज पडिला विसरु । आता काय करू पांडुरंगा ॥२॥
अझुनि का नये तुह्मासी करुणा । दुरि नारायणा धरिले मज ॥३॥
तुका म्हणे जीव जाऊ पाहे माझा । आता केशीराजा घाली उडी ॥४॥

अर्थ :
हे देवा मागे तु पुष्कळ भक्तांचे अडचणीच्या वेळी रक्षण केलेस त्यांनी तुझे नाम घेतले की त्यांचे निर्वाणीच्या वेळेस तु त्यांच्यासाठी धावून गेलास. हे मला चांगल्याच रितीने माहित झाले आहे त्यामुळेच मी तुझा धावा करीत आहे. हे पांडुरंगा तुला माझ्याविषयी मात्र आता विसर पडला आहे त्यामुळे मी आता काय करू हे तुच मला सांग. हे नारायणा तुम्हाला अजूनही माझ्याविषयी दया का येत नाही असे तुम्ही मला तुमच्यापासून दूर का धरले आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे केशीराजा आता तुझ्या वाचून माझा जीव जाऊ पाहत आहे त्यामुळे माझ्या भेटीसाठी तु लवकर उडी घालावी.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग